मुंबई: आयुष शर्माच्या ‘लव्हरात्री’ चित्रपटात मोठा बदल करण्यात आला आहे. काही दिवसांपासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. यामुळे चित्रपटाचे नाव ‘लव्हयात्री’ असे करण्यात आल्याचा अंदाज केला जात आहे.
सलमानने ट्विटरवरुन चित्रपटाचे नाव बदलून नवीन पोस्टर शेअर केले आहे. हा चित्रपट गुजराती पार्श्वभूमीवर असून नवरात्र या सणावर काही महत्त्वाचे भाग चित्रित करण्यात आले आहे. ‘लव्हरात्री’ या शब्दाने सणाचा अपमान होत आहे, असे एका संघटनेने म्हटले असून चित्रपटाला विरोध दर्शविला होता. त्यांनी चित्रपटाचे नाव बदलण्याची मागणी केली असता मागणी पूर्ण न केल्यास स्क्रिनिंग होऊ देणार नाही असे ते म्हणाले.
This is not a spelling mistake… #loveyatri #lovetakesover…@SKFilmsOfficial @aaysharma @Warina_Hussain @abhiraj21288 @TSeries pic.twitter.com/WcI5tbXkke
— Salman Khan (@BeingSalmanKhan) September 18, 2018
फिल्म मेकर्सनी वादातून सुटका होण्यास चित्रपटाच्या भल्यासाठी बदल करुन ‘लव्हयात्री’ असे नावात बदल केले. हा चित्रपट येत्या ५ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.