लश्कर-ए-तोयबाशी मुशर्रफांची हातमिळवणी

0

इस्लामाबाद । पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनी पाकिस्तानमध्ये होणार्‍या आगामी निवडणुकीत दहशतावाद्यांसोबत हातमिळवणी करण्याची जाहीर घोषणा केली आहे. मुशर्रफ यांनी जमात-उद-दावा आणि लश्कर-ए-तोयबा या दोन अतिरेकी संघटनांशी निवडणुकीत आघाडी करण्याची तयारी दर्शविली आहे. विशेष म्हणजे मुशर्रफ यांनी या दोन्ही अतिरेकी संघटनांना ’देशभक्त’ संबोधून त्यांची भलामण करण्याचा प्रयत्न केला आहे. मी लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा खंदा समर्थक असून त्यांचीही मला पसंती आहे.

बांगलादेश निर्मितीचा बदला काश्मिरात घेणार!
तसेच मी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदचीही भेट घेतली होती. असे सांगतानाच ’मलाही काश्मीरमध्ये भारतीय सैन्याला पराभूत करायचे होते,’ असेही त्यांनी सांगितले. 1971 च्या भारत-पाकिस्तान लढाईत भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. यावेळी बांगलादेशला पाकिस्तानपासून तोडण्यात आले. याचा बदला आम्ही कश्मीर स्वतंत्र करून घेऊ असे जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदने लोहोरमध्ये एका सभेत सांगितले.