नवी दिल्ली: भारत-चीन सीमेवर भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये जोरदार संघर्ष झाला. यात 20 भारतीय जवान शहीद झालेत तर 40 पेक्षा अधिक चिनी सैनिक मारले गेलेत. यानंतर सीमेवर कमालीचे तणाव वाढले आहे. युद्धजन्य स्थिती निर्माण झाले आहे. दरम्यान आज लष्करप्रमुख मनोज नरवणे आजपासून दोन दिवस लेह-लडाख दौऱ्यावर गेले आहेत. यादौऱ्यात ते सीमेवरील परिस्थितीची माहिती घेणार असून ग्राउंड रियालिटी जाणून घेणार आहे. यावेळी लष्कराचे जवान आणि अधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहे. सीमेवर तणाव असताना देशातील राजकारण देखील कमालीचे ताणले गेले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहे.