लष्करातील जवानांना चोरट्यांनी लुटले

0

नवी दिल्ली-भारतीय लष्कराच्या जवानांना रेल्वेच्या वेटिंग रूममध्ये लुटल्याची घटना दिल्लीत घडली आहे. चोरट्यांनी या जवानांचे कपडे, मोबाइल, ओळखपत्रे आणि इतर महत्त्वाचे सगळे सामान घेऊन पोबारा केला आहे. आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ओल्ड दिल्ली स्टेशनच्या वेटिंग रूममध्ये झोपले होते. त्यावेळी ही लुटीची घटना घडली आहे.

चोरट्यांनी लष्कराच्या जवानांचे सगळे सामान घेऊन पोबारा केला. या सुटकेसमध्ये जवानांचे मोबाइल, पैसे, कपडे आणि इतर महत्त्वाचे सामान होते. या प्रकरणी रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये जवानांनी तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरु केला आहे. रेल्वेच्या दिल्ली विभागाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याचीही माहिती मिळते आहे.