नवी दिल्ली । भारतीय लष्कर आता अधिक सक्षम होणार आहे. कारण, लवकरच भरतीय लष्कराच्या ताफ्यात हेवीलिफ्टर हेलीकॉप्टर चिनूकचे आगमन होणार आहे. गेल्या वर्षी सप्टेबर महिन्यात अमेरिकेची नामांकीत कंपनी बोईंग आणि भारत सरकार यांच्यात 22 अपाचे आणि 15 चिनूक हेवीलिफ्टर हेलिकॉप्टर खरेदी करण्याबाबत करार करण्यात आला होता. हा करार सुमारे 3 बिलियन डॉलरचा होता. सुत्रांकडील माहितीनुसार 2019 मध्ये हेलिकॉप्टर चिनूकचा पहिला ताफा भारतीय लष्करात सहभागी होईल.
वाहतुकीसाठी वापर
सीएच-47 डी चिनूक हेलिकॉप्टर हे यूएस आर्मीची ताकद म्हणून ओळखले जाते. हे मल्टीमशीन श्रेणीतील हेलीकॉफ्टर आहे. या हेलिकॉफ्टरची ओळख सांगायची तर, याच हेलीकॉप्टरमध्ये बसून अमेरिकेचे कमांडो ओसमा बीन लादेनला ठार करण्यासाठी गेले होते. अमेरिकेच्या लष्कराकडे 478 हेविलिफ्टर हेलिकॉप्टर असल्याचे सांगितले जाते. रणभूमीवर असणार्या अमेरिकेच्या सैन्याला शस्त्रास्त्रांचा पूरवठा करणे, सैन्याला रसद पोहोचवणे, वैद्यकिय आणि तशाच काही महत्त्वपूर्ण सेवा पूरवणे असा विवीध गोष्टींसाठी चिनूकचा वापर केला जातो.
तोडीस तोड उत्तर
चिनूक हेलिकॉप्टरची ताकद जगातल्या सर्वच देशांच्या लष्कराला माहीत आहे. त्यामुळे चीन आणि पाकिस्तानच्या भारत विरोधी हालचाली आणि वेळ पडलीच तर ताकद दाखवून देण्यासाठी चिनूक हेलिकॉप्टर महत्त्वाची जबाबदारी पार पाडेन.