श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात आज सोमवारी पहाटेपासूनच जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. शोपियान जिल्ह्यातील सनग्रान परिसरात एक घरामध्ये तीन दहशतवादी लपल्याची माहिती समोर आली आहे. जवानांनी परिसराला घेराव घातला आहे. भारतीय सैन्य, सीआरपीएफ आणि एसओजी यांची दहशतवाद्यांविरोधात संयुक्त मोहीम सुरू आहे.
सनग्रानमध्ये एका घरात दहशतवादी लपल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाल्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली. शोध मोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. यानंतर जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे.