बारामुल्ला: जम्मू-काश्मीरमधील बारामुल्लामधील क्रिरी सेक्टरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. यामध्ये उत्तर काश्मीरमधील लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा महत्वाचा कमांडर सज्जाद हैदर, त्याचा पाकिस्तानमधील साथीदार उस्मान आणि स्थानिक सहाय्यक अनायतुला यांचा समावेश आहे. मागील चार दिवसांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. त्यातील चार दहशतवाद्यांचा काश्मीरमधील टॉप टेन दहशताद्यांमध्ये समावेश होता. जवानांनी केलेली ही कारवाई कौतुकास्पद आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या अगोदर तीन दिवसांपूर्वी बारामुल्ला येथे जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत, लष्कर ए तोयबाचा कमांडर सज्जादचा खात्मा करण्यात आला होता. तसेच, अन्य दोन दहशतवाद्यांचा खात्मा देखील करण्यात देखील जवानांना यश आले होते. या करावाई अगोदर सोमवारी सकाळी सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एक स्पेशल पोलीस ऑफिसर (एसपीओ) शहीद झाले होते.