लष्काराने 3 दहशतवाद्यांना जिवंत पकडले

0

श्रीनगर : काश्मीरमध्ये लष्कराला मोठं यश मिळालं आहे. मऑपरेशन हलनकुंडफ अंतर्गत लष्कर आणि राज्याच्या पोलिसांनी कुलगामसह अन्य भागातून तीन दहशतवाद्यांना जिवंत पकडले आहे. त्यातील एक दहशतवादी जखमी आहे.
लष्कर आणि राज्याच्या पोलिसांनी 14 नोव्हेंबरपासून दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र केली आहे. मऑपरेशन हलनकुंडफअंतर्गत कारवाईदरम्यान लष्कराने तीन दहशतवाद्यांना जिवंत पकडले आहे. त्यातील एक दहशतवादी जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरु आहेत, अशी माहिती पोलीस महासंचालक मुनीर खान यांनी गुरुवारी दिली.

पाकिस्तानकडून सोशल मीडियाद्वारे चिथावणी
काश्मिरी तरुणांना प्रलोभने देऊन दहशतवादी गटांमध्ये सामील करून घेतले जात आहे. तसेच पाकिस्तानकडून सोशल मीडियाद्वारे चिथावणी दिली जात आहे, असेही खान यांनी सांगितले. लष्कर आणि पोलिसांमध्ये चांगला समन्वय असून दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी ही मोहीम सुरुच राहील, असेही त्यांनी सांगितले. स्थानिक दहशतवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन लष्कराने केले आहे.