लसीकरण मोहीम रद्द झाल्याच्या वृत्तावर आरोग्य विभागाचा मोठा खुलासा

0

मुंबई: कोरोना महामारीच्या संकटावर मात करण्यासाठी एकमेव पर्याय म्हणून कोरोना लसीकडे पहिले जात होते. गेल्या दहा महिन्यापासून लसीची प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा अखेर संपली असून भारतात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. काल शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मोहिमेचा शुभारंभ केला. पहिल्या दिवशीचे लसीकरण सुरळीत पार पडले. परंतु त्यानंतर काही तांत्रिक अडचणींमुळे लसीकरण रद्द करण्यात आल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले, यावर खुलासा करण्यात आला असून लसीकरण मोहीम रद्द केली नसल्याचा खुलासा आरोग्य विभागाने केला आहे.

कोरोना लसीकरणाची नोंदणी ठेवणाऱ्या को-विनअ‍ॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हे लसीकरण रद्द करण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर आरोग्य विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. महाराष्ट्रात आरोग्य विभागातर्फे नियोजित असलेले कोणतेही कोरोना लसीकरण सत्र रद्द करण्यात आलेले नाही. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील आठवड्यामध्ये चार दिवस लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे, असे स्पष्टीकरण आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहे. तांत्रिक बिघाडामुळे रविवारी आणि सोमवारी होणारी लसीकरणाची मोहीम रद्द करावी लागल्याचे वृत्त काही माध्यमांमधून प्रसिद्ध करण्यात आले होते.