जळगाव: जळगाव जिल्हाधिकारी महसूल जिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान संपर्कात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. श्री. भारदे यांनी १५ दिवसांपूर्वी कोरोना
लसीचा पहिला डोस घेतला होता. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना खोकल्याचा त्रास जाणवत होता. त्यांनी कोरोना तपासणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ते घरीच उपचार घेत आहेत.