लहान मुलांच्या भांडणातून दोन गटात हाणामारी

0

दोन्ही गटातील चार जण जखमी; तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल

शहादा । लहान मुलांच्या भांडणतुन धुमचक्रि होऊन त्यात चार जण जखमी झाल्याची घटना काल सकाळी ११ वाजे दरम्यान तळोदा शहरात घडली या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण बनले होते. एकच चर्चा सुरू आहे. तळोदा शहातील अंबादास नगर येथे दोन मुलांच्या वाद सुरु होता. या वादाचे परिवर्तन भांडणात होऊन एक गट दुसर्‍या गटावर चालुन आला. यात दोनही गटाकडून लाठ्या काठ्यांच्या सर्रास वापर झाल्याने दोन्ही गटातील चार जण जखमी झाले आहेत.

पोलिसांना केला वेळीच हस्तक्षेप
जखमीत राजेन्द्र धोंडू चौधरी ४५ , मयूर रविंद्र चौधरी,३७ लक्ष्मण गोरख चौधरी, ४५ व इंदुबाई विनायक चौधरी ४२ आदींचा समावेश आहे. जख्मीना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याना पुढील उपचारासाठी जिल्ह्या रूग्णल्यात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी घटनेची तात्काळ दखल घेतल्याने मोठा संघर्ष टळला.

दरम्यान याबाबत तळोदा पोलिस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता घटनेतील जखमी गंभीर असल्याने ते जबाब देण्यास असमर्थ असल्याने त्यांच्या जवाब घेतल्यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल से सांगितले. जखमी पैकी राजेंद्र चौधरी हे धुळे येथील खाजगी रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रवृत्ती गँभिर असल्याचे कळते.