लहान मुलांना गालफुगी

0

खेड । खेड तालुक्यातील पश्‍चिम आदिवासी भागातील नायफड आणि वांजाळेे या गावांतील मुलांना गालफुगी रोगाची लागण झाली आहे. बदलत्या हवामानामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात विषाणूजन्य जंतूंची वाढ झाल्याने लहान मुलांना ताप येऊन गालाला सूज येत आहे. अनेकांनी डेहणे येथील दवाखान्यात उपचार घेतला आहे. दरम्यान, गालफुगी झालेल्या मुलांनी अगर नागरिकांनी घाबरून न जाता जास्तीत जास्त पाणी प्यावे तसेच जवळच्या सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन खेड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश गोरे यांनी केले आहे.
जीएसटीचे स्वागत