लाँकडाऊनचा गैरफायदा घेत कत्तलीसाठी जनावर शहरात

0

तीन बैलांसह एक अपे रिक्षेसह 55 हजाराचा मुद्देमाल जप्त

शहादा। कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लाँकडाऊन परिस्थिती असतांना याचा गैरफायदा घेत कत्तलीसाठी जनावर शहरात आणत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहरातील अब्दुल हमीद चौकात दोन गट समोरासमोर ठाकले होते. मात्र पोलिसांनी योग्यवेळी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी दोन संशयितांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांच्या ताब्यातून तीन बैलांसह एक वीना क्रमांकाची अपेरिक्षा असा एकूण 55 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

शहरात संचारबंदी कायम आहे. याचा गैरफायदा घेत गुरुवारी रात्री 11:45 वाजता हे खेतिया रस्त्याकडून अब्दुल हमीद चौकाकडे एक विना क्रमांकाची निळ्या रंगाची अपेरिक्षा कत्तलीसाठी जनावरे आणत असल्याची माहिती मिळाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. त्यापूर्वी रिक्षा अब्दुल हमीद चौकात आल्यानंतर त्यात तीन बैल आढळून आले. हे तिन्ही बैल कत्तलीसाठी आणल्या असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला होता. यावरून दोन्ही गटात शाब्दिक चकमक होत असताना मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली होती. मात्र योग्यवेळी पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील उपनिरीक्षक विक्रांत कचरे व पथकाने घटनास्थळी धाव घेतली पुढील मोठा अनर्थ टळला.

याप्रकरणी शहादा पोलिसात पोलीस कॉन्स्टेबल योगेश रामदास माळी यांच्या फिर्यादीवरून कैसर खान जाकिर खान कुरेशी (वय 21) व मोईन खान फारुख खान कुरेशी (वय 20, दोन्ही रा. नूर मशीदजवळ, शहादा) या दोघांच्या विरोधात जनावरांची निर्दयीपणे वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून दोघांच्या ताब्यातून पंधरा हजार रुपये किमतीचे तीन बैल व 40 हजार रुपये किमतीचे रिक्षा असा 55 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे जप्त केलेले तिघही बैल नंदुरबार तालुक्यातील चौपाळे येथील अरिहंत गो सेवा सेवाभावी संस्था यांच्या ताब्यात दिले आहे.