लाँकडाऊनचे उल्लघंन; “त्या” ११ जणांवर गुन्हा दाखल

0

नवापूर। सोलापुर येथुन धार्मिक कार्यक्रम आटोपुन रात्री १२ वाजता नवापूर शहरात दोन वाहनांनी ९ जण व त्यांच्यासोबत असलेले दोन वाहक अशा ११ लोकांना ताब्यात घेऊन १४ दिवसासाठी होम क्वारंटाइन कक्षात ठेवण्यात आले आहे. प्राथमिक तपासणीत कोणालाही कोरोनाची लक्षणे नाहीत. आरोग्य विभागाने पोलीसांच्या मदतीने सर्वाना ताब्यात घेऊन संचारबंदी मोडल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांना माहिती मिळाल्याने त्यांनी आरोग्य विभागाच्या टिमसह घटनास्थळी धाव घेतली.सहायक पोलीस निरिक्षक दिंगबर शिपी यांच्या मदतीने सोलापुरहुन आलेली वाहने व लोकांना गावाच्या प्रवेशद्वाराजवळच अडवुन सर्वाची आरोग्य तपासणी करण्यात आली.सध्या कुठलीही लक्षणे दिसुन आली नसुन खबरदारी म्हणुन होम क्वारंटाइन कक्षात ठेवण्यात आले आहे. नवापूर तालुक्यात सध्या १८८२ लोकांना होमक्वारंटइन केले आहे.सीमेवर कडक तपासणी होत असुन अद्याप तरी नवापूर सेफ आहे.सोलापुरहुन आलेल्या त्या १२ जणांची चार सदस्य असलेल्या पथकाकडुन रोज तपासणी करण्यात येणार असल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी हरीश्चंद्र कोकणी यांनी दिली.

एका पुण्याहून आलेल्या एका व्यक्तीच्या घशातील द्रव्य लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्याला कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आल्याने प्रशासनाने त्याची आरोग्य तपासणी केली. या व्यक्तीला नंदुरबार येथे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहेे. त्याच्या संपर्कात आलेल्या दोन महिला एक पुरुष व दोन मुलांना नवापूर येथे होम क्वारंटाइन केले आहे.