धुळे। समस्त आंबेडकरी जनतेच्या श्रध्दास्थान असलेल्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती जागविण्यासाठी काल लळींग जवळील लांडोर बंगला परिसरात रिपब्लिकन जनतेने आनंदोत्सव साजरा केला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे दिवसभर आयोजन करण्यात आले होते. सकाळी 6 वाजेपासून लांडोर बंगला परिसरात नागरिकांची गर्दी सुरु झाली. दुपारपर्यंत तर या ठिकाणी हजारोंचा जनसमुदाय जमा झाला होता.
महिला व युवतींचीही लक्षणीय उपस्थिती
भिमस्मृती यात्रा बहुउद्देशीय प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रीय उपाध्यक्ष तानसिंग ननवरे, धुळे जिल्हा रिपाई अध्यक्ष संजय पगारे, दलित नेते वाल्मिक दामोदर, एम.जी.धिवरे, शशिकांत वाघ, प्रा.शरद पाटील, मिनाताई बैसाणे, अॅड.साहेबराव भामरे,सिध्दार्थ बोरसे, दिलीपआप्पा साळवे, योगेश ईशी, भैय्या पारेराव, प्रा.अनिल दामोदर, गुलाब पटाईत, रमेश श्रीखंडे, बलराज मगर, राहुल धिवरे, शंकरराव थोरात आदी मान्यवरांसह आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. यात महिला व युवतींची संख्या लक्षणीय होती.