माजी आमदार राजीव देशमुख यांची भेट ; सुरळीत वीजपुरवठ्याबाबत सूचना
चाळीसगाव- तालुक्यातील लांबेवडगांव परीसरातील उसाच्या क्षेत्रात मंगळवारी दुपारी अचानक लागली. या दुर्घटनेत संजय पाटील, मनोज वाणी, वामन पाटील यांच्या शेतातील 8 ते 10 एकर उस क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदर घटनेची माहीती मिळताच तालुक्याचे माजी आमदार राजीव देशमुख यांनी चाळीसगाव नगरपरीषदेच्या अग्निशमन दलास माहिती कळवत घटनास्थळी भेट दिली. परीसरातील खंडीत वीजपुरवठा नियमीत सुरळीत करून शेतकर्यांचे नुकसान होणार नाही याबाबत वीज कंपनीच्या अधिकार्यांना सूचना दिल्यात. यावेळी पं.स.सदस्य अजय पाटील, बाजार समिती संचालक कल्याणराव पाटील, नगरपरीषदेचे माजी उपाध्यक्ष भगवान पाटील, मिलिंद शेलार आदी उपस्थित होते.