शहादा । तालुक्यातील लांबोळा करजई गावादरम्यान तिहेरी अपघातात बस मधील चालकासह पंधरा व मोटार सायकलवरील दोन असे सतरा लोक जखमी झाले आहेत. ही घटना सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली आहे. लांबोळा येथिल एक वृध्द सकाळी आठ दहा बकर्या चारण्याकरीता सकाळी करजई रस्ताकडे जात होता. बकर्या शेतातून रस्तावर आलेल्या होत्या त्याच दरम्यान गुजरातकडुन शिरपुरकडे एक कन्टेनर भरधाव वेगात येत होता. रस्तावर बकर्या व वयोवृद्ध एक इसम होता.
बसमधील प्रवासी भयभित
बसमधील प्रवासी भयभित खाली उतरत होते.त्याचदरम्यान करजईकडुन शहाद्याकडे दुचाकी वाहन भरधाव वेगाने येत होता.दुचाकी वाहन चालकाचा ताबा वाहणावर न राहिल्याने वाहण सरळ बसच्या मागच्या बाजूस धडकला. त्यात मोटार सायकलवरील चालक यांच्या चेहरास व नाकास तर मागे असणारा युवकाच्या छातीला मार लागला आहे. तर कंन्टेनरने तेथुन पोबारा केला.तिहेरी वाहन अपघातात बसमधील चालक फिरोज हाफीज पिजांरी(38) रा.सावखेडा यांच्या हाताला मार लागल्याने हात फॅक्चर झाला आहे. तसेच दिलीप विक्रम पाटील(60) रा.नंदुरबार,सागर दिलीप पाटील(32),श्रीराम भावराव मोरे (55),श्रावण भूता सिरसाठ (55) सर्व राहणार नंदुरबार, प्रेमराज चिंतामण माळी रा. चौपाळे (32) मानसिंग इंदरसिंग चितोडीया(55) चाळीसगाव,मंगेश गायकवाड रा. पिपंळनेर यांना जास्त दुखापत झाली आहे.
बस सरळ कंन्टेनरच्या मागील बाजूस धडकली
त्यांना वाचविण्यासाठी कन्टेनर चालकाने वाहनाचा ब्रेक दाबत भरधाव वाहन हळु करण्याच्या प्रयत्न करीत होता त्याचदरम्यान शहादा आगारातील नंदुरबार ते शहादा बस एम एच 30 बी एल 3516 ही मागुन येत होती. वाहनचालक एम.एफ.मन्सुरी यांनी वाहन नियंञणात आणत असताना बस सरळ कंन्टेनरच्या मागील बाजूस धडकल्याने बस मधील चालक मन्सुरीसह पंधरा प्रवाशांच्या दाताला,तोंडाला,नाकाला,छातीला किरकोळ दुखापत झाली आहे.कंटेनरवर बसचे पुढील भाग आदळल्याने प्रवांश्याना मोठा अपघात झाल्याचा भास झाला.
पालिका ग्रामीण रूग्णालयात उपचार
या सर्वांवर येथिल पालिका ग्रामीण रूग्णालयात डॉ. जितेंद्र भंडारी यांनी प्राथमिक उपचार केले आहे.घटनेचे वृत्त कळताच आगार प्रमुख लिंगायते,स्थानक प्रमुख संजय कुलकर्णी यांनी रूग्णालयात येऊन प्रवांशाची विचारपुस केली. नगराध्यक्ष मोतीलाल पाटील,नगरसेवक संदिप पाटील,संजय साठे,संतोष वाल्हे,जितेंद्र जमदाले आदिनी येऊन रूग्णालयातील जखमीची माहिती घेत प्रवाशी रूग्णांना दिलासा दिला.