दोंडाईचा । प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या बसमध्ये अस्वच्छता असल्याने प्रवाश्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. दोंडाईचा डेपोतील बसमध्ये पाण्याच्या बाटल्या, रिकामे पाणीपाऊच, फॉस्ट फ्रुटचे रिकामे बॉक्सचा मोठ्या प्रमाणावर खच लागलेला असतो. बहुतेक प्रवाशी उरलेले अन्न कागदातच बसमध्ये सोडुन देत असल्याने कुजलेल्या अन्नाच्या दुर्गंधीने प्रवाशी हैराण होत आहेत.
कर्मचारी युनियनबाजीत…
दोंडाईचा येथुन सकाळी सुटणार्या बहुतेक बस नंदुरबार रोडवरील बस डेपोमधुन येतात. या बसेसमध्ये मोठ्या प्रमाणावर डास व आसनांवर धुळ साचलेली असते. या बाबत अनेकदा वाहकांकडून प्रवाशी तक्रार पुस्तीकेची मागणी करतात, परंतु वाहक तक्रार पुस्तीका देत नसल्याने सुज्ञ प्रवाशी व वाहक यांच्यात वाद घडून येतात. देशात व राज्यात विद्यमान सरकार स्वच्छतेसाठी मोठी जागृती करीत असले तरी एस.टी. महामंडळ शासनाच्या या मोहीमेला हरताळ फासत आहेत. तर वाहक सांगतात की, बसची स्वच्छता हा आमचा विषय नसुन त्यासाठी डेपोमध्ये स्वतंत्र यंत्रणा असते. मात्र बहुतेक कर्मचारी कामाची टाळाटाळ करीत युनियन बाजीमध्ये रंगले आहेत. तर काही कर्मचार्यांना राजकीय वरदहस्त व अधिकार्यांच्या अंतर्गत वादाचा फायदा घेत राजकीय रंगाल रंगले आहेत. यांचा कामाचा दैनंदिन रिपोर्ट विचारायला कुणी तयार नसल्याने डेपोमध्ये अराजकता माजली आहे.
एसटीची वेबसाईट व हेल्पलाईन कुचकामी
आपत्कालीन परिस्थितीत प्रवाश्यांना संर्पक साधता यावा यासाठी एसटी बसमध्ये संकेतस्थळ व हेल्पलाईन नंबर 1800221250 देण्यात आला आहे. या नंबरवर एस.टी संदर्भात तक्रार अथवा माहिती घेता येते. मात्र हा नंबर कधीहा लागत नसुन लागला तरी संवाद साधला जात नाही. कारणे दाखवत फोन कट केला जातो. तर वेब बहुतेक वेळा ओपण होत नाही. अशा वेळी तक्रार करायची तर कुणाकडे हा प्रश्न प्रवाश्यांना पडला आहे. डेपोमधील बहुतेक कर्मचारी कार्यालयीन वेळात पुढारपण करीत फिरतात. तर काही साहेबांच्या घरी तेल, मिठ, मिरच्या आणण्यात व्यस्त असतात. काही कर्मचारी ड्युटी म्हणजे आपण उपकार तरीत असल्याचे दाखवत प्रवाश्यांना वाईट वागणुक देतात.
प्रवाशीच करतात कचरा…
लांबपल्याच्या बस व रातराणी बसमध्ये बहुतेक प्रवाशी सोबत जेवनाचा डबा आणतात. जेवन झाल्यावर उरलेले अन्न व पॅकीगसाठी वापरण्यात आलेले बॉक्स पेपर व पाण्याची बाटली, केळीच्या साली, अर्धवट खालेली फळे कुठलीही, सुर्यफुलाच्या बिया, शेंगाची टरफले, कुरकुरे नमकीनची पॉकीटे, विमल गुटखाच्या पुड्या असे सर्व गाडीत टाकतात तर अनेक प्रवाशी गुटखा खावुन गाडीतच थुंकतात. याला वाहक कुठलाही मज्जाव करीत नाहीत. म्हणुन हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. प्रवाशी या देशाचे नागरिक म्हणुन त्यांचे कर्तव्यच विसरले आहेत. सारे सरकार करेल हे सगळे सरकारचे काम असल्याच्या अर्विभावात अस्वच्छता करीत आहेत. मात्र नागरिक म्हणुन या देशाप्रती आपलेही काही कर्तव्य आहेत हे नागरिक विसरले आहेत.