लाइटिंग डेकोरेशन संघटनेच्या अध्यक्षपदी संतोष दप्तरी; उपाध्यक्षपदी आरिफ खान

0

जळगाव : शहरातील लायटींग डेकोरेशन व्यावसायिकांनी टेन्ट मंडप व इव्हेंट व्यावसायिकांच्या वाढत्या स्पर्धेमध्ये डेकोरेशन व्यावसायिकांची होत असलेली गळचेपी व दरावरून होत असलेली ओढाताण यामुळे व्यवसाय धोक्यात आल्याने, अखेरीस एकत्रित येण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच झालेल्या लाइटिंग डेकोरेशन व्यावसायिकांच्या बैठकीत संघटनेची स्थापना करण्यात आली असून, कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
संतोष विजय दप्तरी (अध्यक्ष), आरिफ अफजल खान (उपाध्यक्ष), जयेश मधुसुदन खंदार (सचिव), अरशद अयुब खान (सहसचिव), ऐजाज अजीज पठाण (कोषाध्यक्ष), अशोक कालुराम चौरसिया (सदस्य), चंद्रकांत पंढरीनाथ वाणी (सदस्य). यावेळी झालेल्या बैठकीत सर्व व्यावसायिकांमध्ये एकोपा निर्माण व्हावा यासाठी उद्योगातील अडचणी दूर करण्यासोबतच समान दर ठेवणे तसेच उद्योगात कार्यरत असणार्या व्यावसायिक व कर्मचार्यांकरिता आर्थिक पुरवठा करणारी पतसंस्था, लिजिंग फायनान्स, पूरक उद्योगासाठी सहाय्य, सामुहिक आयुर्विमा, मुलांच्या शिक्षणासाठी सहाय्य आदी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले आहेत.