लाकडांची अवैध वाहतूक थांबवा

0

चाळीसगाव । चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मोठी हिरवीगार झाडे कापुन त्याची वाहतूक होत असुन यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. ही वृक्षतोड थांबवावी तसेच कार्यवाहीसाठी कोणत्या कर्मचार्‍यांची नियुक्ती आहे. त्याचे वर्षभरातील फोन कॉलची तपासणी करावी, संबंधितांवर कारवाई न झाल्यास रयत सेनेच्या वतीने वनविभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत डफडे बजाव आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात वृक्ष लागवड देखील मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असून मात्र चाळीसगाव तालुक्यात झाडांची मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड व लाकडाची चोरटी वाहतूक थांबवून संबंधितांवर कारवाई करा, अशी मागणी वनपरीक्षेत्र अधिकारी संजय मोरे यांना निवेदन देण्यात आले आहे.

वनविभागाकडून कारवाईस दिरंगाई : तालुक्यात हिरवीगार मोठ मोठी झाडे कापली जात आहेत, तसेच ही झाडे कापल्यानंतर वाहनांनमध्ये टाकुन व्यापारी चाळीसगाव, पातोंडा, कजगाव येथील सॉ मिलमध्ये नेतात. त्यानंतर ती झाडे कापुन त्यांच्या फळ्या व इतर वस्तु बनवुन मालेगाव, धुळे या ठिकाणी विक्रीसाठी पाठविली जातात. शहरात रोज रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टर द्वारे कापलेली झाडे शहरातील सॉ मिल मध्ये आणली जातात. मात्र झाडांची अवैध वाहतुक करणार्‍या ट्रॅक्टर मालक व व्यापारीवर अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई झालेली दिसत नाही चोरटी वाहतुक करणार्‍या वाहनावर कारवाई साठी नेमणुकीला असलेल्या कर्मचारी ना चोरटी लाकडांची वाहतुक करणारे वाहन दिसत नाही का तसेच त्यांची नेमणूकी च्या ठिकाणी आहे तेथे कर्मचारी न थांबता इतर कुठे असतात? गेल्या वर्षाभरापासून कोणत्याही वाहनांवर कारवाई केली जात नसल्याचे दिसत आहे. यांचे व्यापार्‍याशी संबंध आहेत का त्यामुळे वृक्ष तोड करणार्‍यांना अभय मिळत असल्याचे ही बोलले जात आहे. तसेच वृक्षतोड थांबण्यासाठी ज्या कर्मचार्‍यांची नियुक्ती केली असेल त्याची जानेवारी 2016 पासून आज पावेतो फोन कॉल ची तपासणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. वृक्षतोडीमुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर र्‍हास होत आहे त्यामुळे पर्जन्यमानावर देखील परीणाम होऊन दुष्काळ पडण्याची भीती असते व तापमानात वाढ होऊन उन्हात देखील वाढ होत आहे मागील वर्षी दि 22 फेब्रुवारी 2016 रोजी संघटनेतफे आपणास वृक्षतोड थाबविण्यासाठी निवेदन देण्यात आले होते त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सॉ मिलमध्ये रोज मोठ्या प्रमाणावर लाकडाची व वस्तुची विक्री होतांना दिसत आहे. यासाठी सीसीटीव्ही बसविण्यात यावे लवकरात लवकर या प्रकारावर आळा बसावा अवैधवृक्ष तोड थांबवुन संबंधितावर गुन्हे दाखल करावेत, असे न झाल्यास 1 मे महाराष्ट्र दिनी रयत सेनेच्या वतीने वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालया समोर बेमुदत डफडे बजाव आंदोलन करण्यात येइल असा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनावर यांच्या स्वाक्षर्‍या
निवेदनावर संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, प्रदेश सचिव प्रमोद वाघ, जिल्हाअध्यक्ष संजय कापसे, जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत कदम, राजेश पाटील, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष सप्निल गायकवाड, मुकुंद पवार, भरत नवले, दत्तु पवार, शहराध्यक्ष मयुर चौधरी, भुषण पाटील, चेतन पाटील, गणेश देशमुख, नाना कापसे, तुषार तांबे, योगेश पाटील, सुनील निबाळकर, विजय गायकवाड, राहुल जाधव, मधुकर पाटील, केशव देवरे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.