जळगाव : जळगाव शहरातील गांधी मार्केट शेजारी असलेल्या ओम एजन्सीतून 22 हजारांच्या रोकडसह सोन्याचे दागिने असा एकूण 97 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
संजय गंगाधर विसपुते सोनार (50, रा.सद्भावना व्यसनमुक्ती केंद्राजवळ, मयूर कॉलनी, पिंप्राळा) हे जळगाव शहरातील गांधी मार्केट शेजारी असलेल्या ओम एजन्सी दुकानावर सोनाराचे कारागीर म्हणून कामाला आहे. या एजन्सीतून सोमवार, 21 मार्च रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने दुकानातील गल्ल्यातून 22 हजार रुपयांची रोकड आणि 75 हजार 800 रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण 97 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. या संदर्भात संजय विसपुते (सोनार) यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक योगेश बोरसे करीत आहे.