लाखानी पार्कमध्ये 28 हजारांचा मुद्देमाल लंपास

0

नवापुर। शहरातील लाखानी पार्कमध्ये अज्ञात चोरटयांनी संधी साधत घरफोडी करुन लँपटाँपसह मोबाईल असा एकुण 28 हजाराचा मुद्देमाल लंपास केला. पोलिस सुञांच्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील दादरी तालुक्यातील जीएचव्ही कंपनीतील इंजि.अरुणकुमार जगुलसिंह हे नवापुरातील लाखानी पार्कजवळ आदर्श नगरमध्ये राहतात. दि 4 ते 8 जुलै दरम्यान बाहेरगावी असल्याने चोरटयांनी संधी साधत बंद घरातील कडीकोंडा व कुलुप तोडुन आत प्रवेश करुन 20 हजाराचे लँपटाँप तर 8 हजाराचा मोबाईल असा एकुण 28 हजाराचा मुद्देमाल लंपास केला होता. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नवापुर पोस्ट येथे गु.र.न 180 /2017 भादवी कलम 380, 457, 454, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याअनुषगाने पो.नि.विजयसिंग राजपुत यांनी गुप्त माहीतीवरुन व पथक तयार करुन 24 तासाचा आत आरोपीना पकडण्यात यश मिळविले आहे.

लॅपटॉप परत मिळाल्याचा आनंद
आरोपी सिध्दार्थ राजु मराठे(22)रा. भगतवाडी,राहुल बाबु गोसावी(26)रा.धडधडया,नवापुर यांना पकडण्यात आले आहे. त्यांनी गुन्हात चोरीस गेलेला लँपटाँप व मोबाईल हे मुद्देमाल काढुन दिला आहे. सदर गुन्हा उघड आणण्याकामी पो.नि.विजसिंग राजपुत यांचा मार्गदर्शनाखाली पो.हे.महेंद्र नगराळे,अमित शेवाळे,दिलीप चौरे,योगेश थोरात,शांतीलाल पाटील,आदीनाथ गोसावी,किरण धनगर यांनी ही कामगिरी केली आहे.पुढील तपास पो.हे महेंद्र नगराळे करीत आहे. सदर घटनेत चोरीस गेलेला लँपटाँप परत मिळाल्याने जीएचव्ही कंपनीतील इंजिनियर अरुणकुमार यांना आनंद झाला. कारण त्यात नँशनल हायवेचे महत्वाचे कागदपत्रे सेव होते. लँपटाँप चोरीस गेल्यावर अरुणकुमार फारच व्यथित व चिंतेत झाले होते. लँपटोप परत मिळाल्याचा आनंद त्यांना झाला. पो. नि. विजयसिंह राजपुत हे नवापुर पोलीस ठाण्यात रुजु झाल्यापासुन गुन्हाचा तपास लावुन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे.