भोसरी : कंपनीसाठी कच्चा माल एका कंपनीकडून घेतला. पण या कंपनीला घेतलेलय मालाचे पैसे दिलेच नाहीत. हा प्रकार ओंकार चेंबर्स, दापोडी येथे 13 सप्टेंबर 2015 ते 31 जानेवारी 2016 या दरम्यान घडला. कुंजबिहारी शालीग्राम गुप्ता (वर 73, रा. नवी सांगवी रोड, औंध) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्राद दिली. यानुसार (कुणाल आरकॉन, पिंपळे सौदागर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्तर राने यांच्या कंपनीसाठी कुंजबिहारी यांच्याकडून कार्बन, रबर कंपाउंड, रिक्लेम रबर असे साहित्य घेतले. 13 सप्टेंबर 2015 ते 31 जानेवारी 2016 या कालावधीत त्याने 14 हजार 300 किलोग्रॅम सामान कुंजबिरही यांचा विश्वास संपादन करून खरेदी केले. या सामानाची एकूण 12 लाख 33 हजार 602 रुपये रक्कम न देता पत्तर राने यांची कंपनी बंद केली आणि स्वतः फरार झाला. यावरून कुंजबिरही यांनी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नसून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.