लाखो रूपयांची कार फिकी… ती मजा इथे…

0

नंदुरबार । शेतात काम करणार्‍या शेतकर्‍यांची दुनियाच निराळी असते,काळी मातीत काम करताना या बळी राजांचा आनंदच काही और असतो, यात शेतकर्‍यांची मुलंही निसर्गाशी एकरूप होऊन आनंद लुटताना पाहायला मिळतात. नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात मे महिन्यात लागवड केलेल्या कपाशीची कोळपणी सुरू आहे हुलकावणी देणारा पाऊस एक दिवशी पडेलच ही भाबडी आशा मनात ठेवून तो काळ्या मातीची सेवा करतच राहतो अशा वेळी त्याच्या सोबत मुलाला मात्र मजाच…मजा वाटत असते, तिफनवर बसून …अथवा कोळपणी च्या दुसेरला झोळी बांधून जणू काही गाडीत बसल्याचा आनंद घेत असतो.