लागवड तंत्र वापरुन कापूस उत्पादन वाढवा

0

जळगाव। शेतकर्‍यांनी आत्महत्या न करता, कापूस, तीळ, भुईमुग, कडधान्य इ. पिकांच्या संशोधनाचे वाण व शिफारसींचा वापर करुन कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन काढावे असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी तेलबिया संशोधन केंद्र येथे राष्ट्रीय कृषी विकास योजने (शेतकरी प्रथम) अंतर्गत एकात्मिक कापूस लागवड तंत्रज्ञान या विषयावर प्रशिक्षणा प्रसंगी केले. कार्यशाळेस जिल्हाभरातून शेतकरी उपस्थित होते.

प्रशिक्षणात तज्ञांनी घेतला सहभाग
प्रशिक्षणामध्ये प्रकल्प सह-समन्वयक डॉ.बी.बी. मुळीक, डॉ. सुदाम पाटील, डॉ. संजीव पाटील, अनिल भोकरे, बाळासाहेब जडे, डॉ.नरेंद्र पाटील, डॉ. मधुकर बेडीस यांनी विविध विषयावर शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. जीवाणूखते, सुक्ष्म अन्नद्रव्ये, जैविक किडनाशके (ट्रायकोडर्मा, व्हर्टिसिलिअम लॅकॅनी), पिवळे चिकट सापळे, कामगंध सापळे, कॉपर ऑक्सीक्लोराईड, डायमेथोएट, स्ट्रेप्टोसायक्लीन, लिंबोळी पावडर इ. निविष्ठांचे वाटप सुदाम पाटील यांचे हस्ते करण्यात आले. सदर योजना धानोरा, मोहाडी ता.जि. जळगाव येथील लाभार्थी शेतकर्‍यांच्या शेतावर खरीप 2017 हंगामात राबविण्यात येत आहे. या शेतकरी प्रशिक्षणामुळे धानोरा, मोहाडी, जळगाव परिसरातील शेतकर्‍यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. दिनेश पाटील व लिलाधर खंबायत, डॉ.एस.बी.गावडे, डॉ.गणेश देशमुख, डॉ.सुमेरसिंग राजपुत, तुषार पाटील, संजय नंदनवार, संदिप दिघुळे, जळगावचे तालुका कृषी अधिकारी व्हि.जी.भारंबे, जळगावचे मंडळ कृषी अधिकारी एल.व्ही. तळेले उपस्थित होते. प्रा.एच.एस. महाजन यांनी आभार प्रदर्शन केले. या सदर प्रशिक्षणासाठी 80 शेतकरी उपस्थित होते.