लाचखोराला अटक

0

चाकण । वीज मीटर बसवून देण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच स्वीकारणार्‍या महावितरणच्या कर्मचार्‍यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी रंगेहाथ पकडले. लहू बापूराव काची (वय 34, रा. चाकण) असे या लाचखोर कर्मचार्‍याचे नाव आहे. याप्रकरणी एका 41 वर्षीय इसमाने तक्रार दिली होती.

तक्रारदार यांची चाकण एमआयडीसीमध्ये शेड व टपरी आहे. या शेड व टपरीसाठी त्यांना विजेची गरज होती. त्यांनी महावितरणकडे अर्ज केल्यानुसार त्यांना वीज मीटरचे कोटेशन मंजूर झाले आहे. काची याने वीज मीटर बसवून देण्यासाठी त्यांच्याकडे 20 हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला दिल्यानंतर चाकण येथील सुमित पॅकेज कंपनीच्या आवारात सापळा रचून लाच स्वीकारताना काची याला रंगेहाथ पकडण्यात आले.