लाचखोरीच्या विहिरीत अभियंता बुडाला!

0

पारोळा । रोहयोतील सिंचन विहिरीचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी 1 हजार रुपयांची लाच स्विकारतांना येथील लघूसिंचन उपविभागाचा कनिष्ठ अभियंता संजीवकुमार चव्हाण याला आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. पारोळा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांचा सापळ्यात सहभाग
जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन उपविभागाचा कनिष्ठ अभियंता चव्हाण याला लाच स्विकारतांना पकडण्यासाठीच्या सापळ्याची रचना पो.नि.महेश भोरटेकर, पो.नि. पवन देसले, जितेंद्रसिंग परदेशी, किरण माळी, कैलास शिरसाठ, देवेंद्र वेंदे, संदिप सरग, सतीश जावरे, संतोष हिरे, सुधीर सोनवणे, कृष्णकांत वाडीले, कैलास जोहरे, प्रकास सोनार, संदिप कदम यांनी केली होती. 6 मार्च रोजी त्याने तक्रारदाराकडे 1 हजार रुपयांची मागणी केली होती.