लाचखोर अभियंता, ग्रामसेवकास पोलीस कोठडी

0

जळगाव । धरणगाव तालुक्यातील चावलखेड्यात पेव्हर ब्लॉक बसवणार्‍या कंत्राटदाराच्या कामाची मोजमाप पुस्तिकेत नोंद घेण्यासाठी पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंत्याने ग्रामसेवकामार्फत एक हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कनिष्ठ अभियंता बाळासाहेब सोनवणे, ग्रामसेवक शीतल पाटील यांना अटक केली होती. त्यांना शुक्रवारी न्यायाधीश लाडेकर यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना 25 जुनपर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

एक हजार रुपयांची घेतली लाच; जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल
तक्रारदार यांनी चावलखेडा येथे माउली चौकात पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम केले होते. दीड महिन्यापूर्वी हे काम पूर्ण झाले आहे. या कामासाठी जिल्हा परिषदेला लाख रुपये मिळाले आहेत. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला बिल देण्यापूर्वी कामाच्या दर्जाची उर्वरितअभियंता,ग्रामसेवकास लाच घेताना पकडले होते. तर मोजमापपुस्तिकेत नोंद करणे आवश्यक होते. त्यानुसार पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता बाळासाहेब काशिनाथ सोनवणे यांनी एक लाख रुपयांच्या बिलापोटी पाच टक्क्यांप्रमाणे पाच हजार रुपयांची लाच मागितली होती; परंतु तडजोडीअंती एक हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले होते. त्यानुसार गुरुवारी बोरखेडा येथील ग्रामसेवक शीतल आनंदा पाटील यांच्यामार्फत ही लाचेची रक्कम स्वीकारली आणि एसीबीच्या पथकाने सापळा रचून सोनवणे यांच्यासह शीतल पाटील यांना अटक केली. दोघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आज शुक्रवारी दोन्ही लाचखोर बाळासाहेब अभियंता काशिनाथ सोनवण व ग्रामसेवक शीतल आनंदा पाटील यांना न्यायालधीश पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. तर दोघांना न्या. लाडेकर यांनी 25 जुनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. सुरेंद्र काबारा यांनी कामकाज पाहिले.