लाचखोर ग्रामसेवकाला अटक

0

धुळे । रस्ता काँक्रीटीकरणाचे काम करणार्‍या ठेकेदाराकडून लाचेची मागणी करणार्‍या ग्रामसेवकास लाचलुचपत विभागाने रंगहोत पकडल्याची घटना 21 नोव्हेंबर रात्री उशीरा घडली. दरम्यान या घटनेतील संशयीत सरपंच व त्यांचा डॉ. मुलगा फरास असल्याने रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा येथील ग्रामसेवक प्रविण मंगलसिंग जाधव, सरपंच केवळबाई ठाकरे व मुलगा डॉ. कैलास ठाकरे यांनी एकुण मंजूर 2 लाख 98 हजार 969 रूपयांच्या 5 टक्के रक्कम म्हणजे 15 हजार रूपयांची मागणी तक्रारदारकडे केली होती. त्यानुसार तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे याची तक्रार केल्यानंतर त्यांनी सापळा रचून ग्रामसेवकाला रक्कम देत असतांना ग्रामसेवकाला रंगेहात अटक पकडले असून रात्री उशिरापर्यंत ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. एसीबीचे उपअधिक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पवन देसले यांनी ही कारवाई केली आहे.