पाच हजारांची लाच घेताना साक्री पंचायत समितीच्या आवारात अटक
साक्री– घरकूल योजनेचा आलेला तिसरा हप्ता लाभार्थींला देण्यासाठी पाच पाच हजारांची लाच स्वीकारताना ग्रामसेविका गीता बैरागी यांना साक्री पंचायत समितीच्या आवारात गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास धुळे एसीबीने रंगेहाथ अटक केली. गिरणीपाडा येथील तक्रारदार असून त्यांना प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत घरकुल मंजूर असून त्याचे दोन जप्ते मिळाले असून तिसरा हप्ता मिळण्यासाठी बैरागी यांनी दोन दिवसांपूर्वी लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने तक्रार नोंदवल्यानंतर धुळे एसीबीचे उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला तर एसीबीचे निरीक्षक महेश भोरटेकर यांच्यासह कर्मचार्यांनी बैरागी यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईने लाचखोरांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.