लाचखोर टेक्शीशीयन एसीबीच्या जाळ्यात

दहा हजारांची लाच भोवली : जळगाव एसीबीची धडक कारवाई

जळगाव/भुसावळ : तक्रारदाराच्या घरगुती मीटरला कमर्शियल न करता तसेच दंड न करण्याच्या मोबदल्यात दहा हजारांची लाच मागणार्‍या जळगाव जोशी जोशीपेठ युनिट सिनीयर टेक्नीशियन शोभना दिलीप कहाने, (56, रा.प्लॉट नं.28, गट नं.501, पवन नगर, ममुराबाद) यांना सोमवारी दुपारी जळगाव एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच अटक केल्याने लाचखोरांच्या या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

कार्यालयात स्वीकारली लाच
जळगावातील 64 वर्षीय तक्रारदाराच्या घरगुती मीटरला कमर्शियल न करता तसेच दंड न करण्याच्या मोबदल्यात आरोपी शोभना दिलीप कहाने यांनी 12 रोजी दहा हजारांची लाच मागितली होती. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी तक्रार दिल्यानंतर पडताळणी करण्यात आली व दीक्षीतीवाडीतील कार्यालयात सोमवारी आरोपींनी पंचांसमक्ष लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात मोठी खळबळ उडाली.

यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधक्षक गोपाल ठाकुर, निरीक्षक निलेश लोधी, हवालदार दिनेशसिंग पाटील, अशोक अहीरे सुनील पाटील, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, सुनीलल शिरसाठ, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ आदींनी हा सापळा यशस्वी केला.