लाचखोर निरिक्षक भोज एसीबीच्या जाळ्यात

0

धुळे । चार्टशीट दाखल करणेकामी शिंदखेडा येथील पोलीस ठाण्याचे लाचखोर पोलीस निरीक्षकास तक्रारदाराकडून 1500 रुपयाची लाच घेतांना धुळे लाचलुचपत खात्याने रंगेहाथ पकडले. दरम्यान या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या कारवाईने शिंदखेडा सह जिल्हाभर एकच खळबळ उडाली. शेवाळी (ता.शिंदखेडा) येथील तक्रारदारास निरीक्षक भोज यांनी 1500 रुपयांची लाच मागितल्याबाबत तक्रारदाराने धुळे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानुसार धुळे एलसीबीने पोलिस उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्यासह जितेंद्र परदेशी, प्रशांत चौधरी, संदीप सरग, संतोष हिरे, सुधीर सोनवणे व पथकाने सापळा रचून शिंदखेडा येथील भुषण हॉटेलच्या रुम नं. 4 मधून निरीक्षक भोजला पकडले.