लाचखोर पोलिसांना जामीन मंजूर

0

जळगाव । भुसावळ ते जळगाव दरम्यान अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनचालकांकडून 200 रुपयांची लाच घेताना एका पोलिस कर्मचार्‍याला शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. तर याच चालकाकडून चार दिवसांपूर्वी पाच हजारांची लाच मागणार्‍या पोलिसालाही याच प्रकरणात अटक करण्यात शुक्रवारी एसीबीने अटक केली होती. दरम्यान, लाच प्रकरणातील दोघांना सोमवारी न्यायालयात हजर केले असत त्यांची 15 हजारांच्या जामीनावर सुटका करण्यात आली आहे.

15 हजारांच्या जामीनावर सुटका
तक्रारदार मोतीराम सुपडू केदारे (वय 40) हे जळगाव-भुसावळ मार्गावर प्रवासी वाहतूक करणारी गाडी चालवतात. त्याच्याकडून नशिराबाद पोलिस ठाण्याचे कर्मचारी चंद्रकांत विक्रम पाटील (वय 36, रा.पिंप्राळा, नशिराबाद पोलिस ठाणे), लक्ष्मण पाटील (वय 47, रा.शाहुनगर, शहर वाहतूक शाखा) यांनी लाच मागितल्या प्रकरणी एसीबीच्या पथकाने शुक्रवारी अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांनी 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. सोमवारी त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपली असता त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर लाचप्रकरणी न्यायालयात कामकाज होवून लाचखोर पोलिसांना 15 हजारांच्या जामीनावर सुटका करण्यात आली.