लाचखोर पोलिस निरीक्षकाला महिनाभरानंतर जामिन मंजूर

0

धुळे। पोलिस निरीक्षक देविदास रघुनाथ भोज, प्रभारी अधिकारी, शिंदखेडा पोलीस ठाणे जि.धुळे यांनी 26जुलै रोजी तक्रारदारांकडून 15 हजार रूपये लाच स्विकारतांना लाचलुचपत विभागाचे पोलीस उप अधिक्षक शत्रुघ्न माळी ह्यांनी त्यांना रंगेहात पकडले होते. यानंतर त्यांना कोटार्ंत हजर करून त्यांची दोन दिवस पोलिस कस्टडी घेऊन तपास करण्यात आला.

कोर्टाने पोनि भोज यांना न्यायलयीन कोठडी दिली 29/6/2017 ते 22/7/2017 पावेतो जिल्हा कारागृह, धुळे व नाशिक येथे होते. सोमवारी त्यांना औरंगाबाद हाईकोटने जामिनावर सोडले आहे. आज पावतोच्या अ‍ॅन्टी करप्सन च्या केसेस मध्ये वरिष्ठ पोलिस अधिकारी जामिन घेण्याकरीता इतका दीर्घ कालवधी कधीही लागलेला नाही हे विशेष.