लाचखोर पोलीस निरीक्षक फरार

0

नागपूर – एका ढाबा मालकाकडून त्याच्यावर कारवाई न करण्याच्या बदल्यात तब्बल साडेचार लाखांची लाच मागणार्‍या दोघा पोलिस अधिकार्‍यांपैकी एक पोलीस निरीक्षकास एसीबीच्या अधिकार्‍यांनी अटक केली खरी मात्र तो त्यांच्याही हातावर तुरी देऊन पळाला. सुभाष काळे असे या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. उमरेड मार्गावर अडवानी ढाबाच्या मालक विष्णू अडवानी यांच्याविरुद्ध कारवाई न करण्याकरता कुही पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुभाष काळे आणि उपनिरीक्षक संजय काळे यांनी साडेचार लाखांची लाच मागितल्याने अडवानी यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर एसीबीने शहानिशा करून मंगळवारी रात्री सापळा रचत पोलीस निरीक्षक सुभाष काळे आणि उपनिरीक्षक संजय चव्हाण यांना लाच घेताना पकडले. या कारवाई दरम्यान निरीक्षक सुभाष काळे व उपनिरीक्षक संजय चव्हाण यांची एसबी पथकाशी हातपाई झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. मात्र एसीबीने त्यांना पकडले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू असताना पहाटेच्या सुमारास एसीबी पथकाला गुंगारा देत पोलीस निरीक्षक संजय काळे फरार झाले.