लाचखोर मंडल अधिकार्‍याला अटक

0

अकलूज । माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथे मंडल अधिकारी कार्यालयात मंडल अधिकारी संजय बाबुराव फिरमे यांना 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना गुरुवारी अटक करण्यात आली. फिरमे हे सदाशिवनगर मंडळात मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत होते. मंडल मधील मांडवे येथे फेरफार रजिस्टरला घेतलेल्या नोंदी प्रमाणित करून देण्याकरीता मंडलाधिकारी फिरणे यांनी तक्रारदाराकडे 15 हजार रुपयांची लाच मागितली होती.

त्यानुसार सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकार्‍यांनी सापळा रचून सदाशिवनगर येथील मंडल कार्यालयात फिरमेने 15 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधकचे पोलिस उपअधीक्षक अरुण देवकर व पोलिस निरीक्षक विश्वास साळुंके यांनी केली.