लाचखोर लेखनिकासह टेक्नीशीयनला पोलिस कोठडी

0

जळगाव/धुळे- सरेंडर बिल मंजुरीसाठी 500 रुपयांची लाच मागणार्‍या धुळे राज्य राखीव दल गट क्रमांक सहामधील लेखनिक तथा एएसआय रणवीरसिंग देवलासिंग राजपूत यास धुळे एसीबीच्या पथकाने गुरुवार, 7 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास साक्री रोड परीसरातील कार्यालयातून अटक केली होती. आरोपीला शुक्रवारी धुळे न्यायालयात हजर केले असता त्यास एका दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली तर जळगावच्या पिंप्राळ्यातील वीज कंपनीच्या वरीष्ठ तंत्रज्ञ व सिनियर टेक्नीशीयन असलेल्या मयुर अशोक बिर्‍हाडे (31) यास नवीन विद्युत मीटर बसवून देण्यासाठी तीन हजारांच्या लाच घेताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अटक केली होती. आरोपीस शुक्रवारी जळगाव न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, दोघाही लाचखोरांच्या घरांच्या झडतीत काहीही आढळले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.