पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्रा लाचखोर शिक्षणाधिकारी अलका ज्ञानेश्वर कांबळे (वय 52, रा. एचए कॉलनी, पिंपरी) व महापालिकेच्या क्रीडा प्रबोधिनी शाळेचे मुख्याध्यापक बाबासाहेब अंबादास राठोड (वय 34, रा. रहाटणी) या दोघांवर सोमवारी निलंबनाची कुर्हाड कोसळली. दोघांच्या निलंबनाचे आदेश महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी काढले. त्यासोबतच दोघांच्या खातेनिहाय चौकशीचेदेखील आदेश देण्यात आले आहेत.
20 हजारांच्या लाचेची मागणी
क्रीडा प्रबोधनासाठी देण्यात येणार्या जेवण व नाष्टाचे बिल पास करून देण्रासाठी तसेच, त्राच्रा अहवालासाठी 20 हजार रुपयांची मागणी शिक्षणाधिकारी कांबळे व मुख्याध्यापक राठोड या दोघांनी ठेकेदाराकडे केली होती. त्रातील पाच हजार रुपरांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्रा पथकाने 21 मार्चला सकाळी रंगेहाथ पकडले होते.
या तरतुदीनुसार कारवाई
महाराष्ट्र महापालिका अधिनिरमातील कलम 56 (1) व 56 (2) (फ) मधील तरतुदींच्रा अधिन महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) निरम 1979 च्रा निरम 4 (1) (क) मधील तरतुदीनुसार शिक्षणाधिकारी कांबळे आणि क्रीडा प्रबोधिनी शाळेचे मुख्राध्रापक राठोड रांचे निलंबन करण्रात आले आहे. तसेच त्रांची खातेनिहार चौकशी करण्राचे आदेश आरुक्त दिनेश वाघमारे रांनी दिले आहेत.