लाचखोर शिपायास एसीबीने रंगेहात पकडले

0

धुळे । तालुक्यातील अजंग येथील शेतशिवारातील शिती राष्ट्रीय महामार्ग क्र.6 साठीच्या चौपदरीकरणासाठी शासनाने संपादिल केले असून 7/12 उतार्‍यावर तक्रारदार व त्यांचे भाऊ यांचे नाव आहे. तक्रारदार यांना जमिन संपादित झाली मात्र अद्यापपर्यंत संपादित केलेल्या जमिनीचा कुठलाही मोबदला मिळाला नाही. याबाबत तक्रारदार उपजिल्हाधिकारी भुसंपादन येथे गेले असता तेथील लोकसेवक शिपाई आरोपी राजेंद्र चुडामण बैसाने (वय-56) यांनी नोटीस काढण्यासाठी आणि चेक काढावयास लावण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 40 हजार रूपयांची लाचेची मागणी केली.

तक्रारदार यांची एवढी रक्कम देण्याची इच्छा नसल्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्याअनुषंगान पडताळणीसाठी एसीबीच्या पथकाने सापळा रचून चौपदरीकरणासाठी संपादित केलेल्या शेत जमीनीच्या मोबदल्याचे पेमेंट साहेबांना सांगुन करून देतो असे शिपाई आरोपी बैसाने यांना तक्रारदार यांना सांगून तडजोडीअंती 15 हजार रूपये लाचेची मागणी केली होती. दरम्यानच्या काळात लोकसेवक श्री. बैसाणे हे रजेवर निघून गेले त्यानंतर वरिष्ठांकडून गुन्हा दाखल करण्यासाठी मंजूरी मिळाल्यानंतर आज 19 जानेवारी रेजी प्राधिकारी भुसंपादन तथा उपजिल्हाधिकारी भुसंपादन, माध्यम पाटबंधारे प्रकल्प यांच्या दालनाबाहेरून लोकसेवक शिपाई राजेंद्र चुडामन बैसाणे (वय-56) यांना पंच साक्षिदार समक्ष ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात धुळे शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.