हडपसर : अपघातात जप्त केली गाडी परत देण्यासाठी पाच हजारांची लाच मागितल्याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचार्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली.
नारायण ज्ञानदेव गोरे (41, पो ना 262, हडपसर पोलीस ठाणे, रा. रामटेकडी) व जगदीश बाबसो कोंढाळकर (45, पो.हवा. 5494 हडपसर पो.ठाणे, रा. महंमद वाडी) अशी अटक केलेल्या पोलीस कर्मचार्यांची नावे आहेत.अपघातामध्ये जप्त केली गाडी परत देण्यासाठी या दोन पोलीस कर्मचार्यांनी तक्रारदार इसमाकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. संबंधित इसमाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर दोघांना पकडण्यात आले. पोलीस निरीक्षक जालिंदर तांदळे पुढील तपास करीत आहेत.