लाच घेतल्याप्रकरणी अग्निशामक विभागातील सब ऑफिसर आणि फायरमन निलंबित

0

पिंपरी :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागातील सब ऑफिसर आणि फायरमनने बांधकामाचे फायर ना हरकत प्रमाणपत्र दिल्याच्या मोबदल्यात १५ लाच घेतली होती. याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.

तक्रारदार यांचे वाकड सर्व्हे क्र 186 येथे बांधकाम चालू होते. तक्रारदार यांनी बांधकामाचे फायर ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी अग्निशामक केंद्र येथे प्रकरण दाखल केले होते. त्यासाठी वानखेडे यांनी प्रोव्हिजनल फायर ना हरकत प्रमाणपत्राची फाइलची पूर्तता करून वरिष्ठांकडे पाठविली होती. तक्रारदाराला त्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र देखील दिले होते. परंतु, या मोबदल्यात सब ऑफिसर उदय माधवराव वानखेडे व फायरमन अनिल सदाशिव माने यांनी तक्रारदाराकडे 25 हजार रुपये लाच देण्याची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाक (एसीबीकडे) तक्रार दिली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंध पथकाने सापळा रचून १९ रोजी तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोघांना रंगेहात पकडले होते.