लाच प्रकरणातील फरार पिता-पुत्रांना अटक करा

0

शिरपूर । वालखेडा येथील टक्केवारीच्या लाच प्रकरणातील फरार आरोपी महीला सरपंच आणि त्यांचा डॉक्टर पूत्र यांना त्वरीत अटक करावी अशी मागणी वालखेडा ग्रा.प.चे उपसरपंच आणि ग्रामस्थांसह ठेकेदारांनी पत्रकार परिषदेत दिली. वालखेडा येथील ग्रामसेवक प्रविण जाधव याने रस्त्याच्या कॉक्रीटीकरणाच्या कामातून टक्केवारीच्या हिशेबाने परस्पर पाच हजार रूपये ठेकेदाराराच्या रकमेतून कापून घेतले. याबाबत ठेकेदाराने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीनूसार संबंधित ग्रामसेवक, महीला सरपंच आणि तिचा मूलगा यांचे विरूध्द धूळे शहर पोलीस स्टेशनमधे गून्हा दाखल झाला आहे. यातील ग्रामसेवकाला 21 रोजी अटक करण्यात आली असून अन्य दोघं आरोपी अद्याप सापडलेले नाही.

पथदिव्यांवर खर्च
उपसरपंच रोहीदास वानखेडे, माजी उपसरपंच संदीप कोळी, ग्रा.प.सदस्य सूरेश येळवे, ठेकेदार दारासिंग शिरसाठ, तंटा मूक्तीचे अध्यक्ष प्रविण मोरे, अशोक माळचे, साहेबराव शिरसाठ, विनायक येळवे यांनी मागणी केली आहे. सरपंच आणि त्यांचा डॉक्टर मूलगा हे मनमानी कारभार करतात. गावात गटारी तूंबलेल्या आहे. वारंवार मागणी करून ती साफ केली जात नाही. गावात पथदीव्यांसाठी 2 लाख 99 हजार 64 रूपये खर्च केले आहे. मात्र पूर्ण गावात लावलेले नाही.

विश्‍वासात घेत नाही
पूर्ण गावाला पाणी पूरवठा होत नाही. ग्रामसेवक व सरपंच हे धूळे येथे राहतात. परीणामी नागरीकांची ग्रा.प.ची कामे होत नाही. सदस्यांना कोणतेही ठराव लिहीतांना विश्‍वासात घेलले जात नाही. कोणतीही आर्थिक व्यवहाराची माहीती दिली जात नाही. चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून पूर्णपणे खोटी कामे करून बनावट कागदप्रत्राच्या आधारे निधी हडप केला आहे असाही आरोप त्यांनी केला.