अमळनेर ।तालुक्यातील जानवे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले डॉ. विशालकुमार अर्जुन पाटील यांनी 17 जून 2014 मध्ये यांच्याविरुद्ध दोन हजार रूपयाची मागणी केली म्हणून लाच लुचपत कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिनेश कोठलीकर यांनी निर्दोष मुक्तता केली. तक्रारदारांनी अपंग व्यक्ती कर्मचारी यांना मोटरसायकल प्रकरणासाठी शिफारस पत्र देण्याकामी 2000 रुपयांची मागणी केली.
म्हणून डॉ विशालकुमार अर्जुन पाटील यांच्या विरुद्ध दि 17 जून 2014 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरच्या खटल्यात साक्षीदार व फिर्यादी तपासण्यात आले व साक्षीदारांच्या जबाब व आलेल्या पुरावावरुण डॉ. विशालकुमार अर्जुन पाटील यांनी कुठ्ल्याही प्रकारे लाच मागितली नाही असे निदर्शनास आल्याने त्यांची निर्दोष सुटका अतिरिक्त सत्र न्यायमुर्ती दिनेश कोठलीकर यांनी केली. सदर खटल्यात आरोपीतर्फे अॅड आर.बी. भटनागर यांनी काम पाहिले तर निलेश गांधलीकर, मोहन पाटील यांचे सहकार्य लाभले.