जळगाव- पत्नीच्या नावे असलेली शेतजमीन बक्षिसपत्राद्वारे तक्रारदाराच्या नावे करण्यासाठी चार हजारांची लाचेची मागणी करण्याचे प्रकरण तालुक्यातील बु.॥ नांंद्रा तलाठ्याच्या चांगलेच अंगलट आले असून जळगाव एसीबीच्या पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्याने महसूल प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. नितीन किशोर पाटील (कानळदा रोड, श्री गजानन नगर, जळगाव) असे अटकेतील तलाठ्याचे नाव आहे.
लाचेची मागणी भोवली
7 फेबु्वारी रोजी आरोपीने जळगाव तालुक्यातील तक्रारदाराकडे लाच मागितली होती मात्र तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्याने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. या प्रकरणी जळगाव एसीबीला लाच मागणीचे पुरावे प्राप्त झाल्यानंतर 30 मे रोजी आरोपीला अटक करण्यात आली तसेच जळगाव तालुका पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक निलेश लोधी, पोलिस निरीक्षक गणेश कदम, हवालदार अशोक अहिरे, सुरेश पाटील, मनोज जोशी, जनार्दन चौधरी, प्रशांत ठाकूर, प्रवीण पाटील, महेश सोमवंशी, नासीर देशमुख, ईश्वर धनगर आदींच्या पथकाने केली.