लाटीपाडा धरणाचे विधीवत जलपूजन

0

पिंपळनेर। साक्री तालुक्याचे भूषण असलेल्या व तालुक्यातील पाण्याची तहान भागविणारे, पावसाचे माहेरघर समजल्या जाणार्‍या संपूर्ण तालुक्याची पिण्याच्या पाण्याची मदार अवलंबून असलेले लाटीपाडा धरण गेल्या दोन दिवसांपूर्वी पूर्णपणे भरल्याने आज या धरणाचे विधिवत जलपूजन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी पंचायत समितीचे सभापती संजय ठाकरे,जि. प. सदस्य ज्ञानेश्वर एखंडे,प्रकाश पाटील,शिवाजी पवार,उपसरपंच योगेश नेरकर,पांडुरंग चौधरी,सतिष पाटील,देवेंद्र कोठावदे,पोपट गांगुर्डे,जे.टी. नगरकर,योगेश बधान,राजेंद्र गवळी,सुभाष जगताप आदी उपस्थित होते.पिंपळनेर येथील लाटीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने नागरिकांसह शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.