यावल : तालुक्यातील मनवेल येथील थोरगव्हाण मार्गावर विनापरवाना गौण खनिजाची वाहतूक करणार्या एका ट्रॅक्टरवर कारवाई करण्यास गेलेले तलाठी हे गेल्याने ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने पायास दुखापत झाली. यावल पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मनवेल गाव शिवारातील मनवेल ते थोरगव्हाण मार्गावरील रस्त्यावर सार्वजनिक ठीकाणी सोमवार, 10 मे रोजी सकाळी 8.40 वाजेच्या सुमारास मनवेल तलाठी स्वप्नील शशीकांत तायडे (37) हे कर्तव्य बजावत असतांना सुभाष सखाराम कोळी (शिरसाड) यांनी त्यांच्या ताब्यातील विना क्रमांकाचे ट्रॅक्टर न थांबवता अंगावर आणल्याने डाव्या पायाला दुखापत झाली व आरोपी हा घटनास्थळावरून ट्रॅक्टर न थांबवता पसार झाला. संशयीतीने शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने स्वप्नील शशीकांत तायडे यांच्या फिर्यादीनुसार सुभाष सखाराम कोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार गोरख गंगाराम पाटील करीत आहेत.