लाडकुबाई विद्यामंदीर शाळेत विद्यार्थी प्रतिनिधी निवड

0

भडगाव । येथील लाडकुबाई विद्यामंदीर शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थींनी प्रतिनिधीची निवडणुक घेण्यात आली. विद्यार्थ्यांना लोकशाही शासन प्रणालीची ओळख व्हावी तसेच लोकशाही शासन प्रणालीची ओळख व्हावी या उद्देशान ही निवडणुक घेण्यात आली. निवडणुकीत इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांला उमेदारी करण्याची संधी देण्यात आली. इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचे विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. 17 व 18 जुलै दरम्यान निवडणुक कार्यक्रम घेण्यात आला.

17 रोजी मतदान घेण्यात आले. 7 विद्यार्थ्यांनी तर 6 विद्यार्थींनीने उमेदवारी करत निवडणुक लढविली. 820 विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजविला. मतदान निवडणुक अधिकारी म्हणून जबाबदारी देखील विद्यार्थ्यांवरच होती. संकेत हितेंद्र देवरे हा विद्यार्थी 380 मते मिळवून 131 मतांनी विजयी झाला. विद्यार्थींनी प्रतिनिधीसाठी दक्षता विठ्ठल पाटील या विद्यार्थिनीस 238 मते मिळवून 51 मतांनी विजयी झाल्या. विजयी विद्यार्थी प्रतिनिधींचे शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली पाटील यांनी सत्कार केले.