चाळीसगाव । चाळीसगाव येथील स्व. बाबुलाल शिनकर यांचे समरणार्थ नंदन दुग्धालयाचे केशव कोतकर व वसंत डेअरीचे वसंत शिनकर यांचे दातृत्वातून भूषण ब्राह्मणकर अध्यक्ष असलेल्या लाडशाकीय युवा मंच या संस्थेस स्वर्ग रथ नुकताच येथील वाणी समाज मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात लोकार्पण करण्यात आला. या स्वर्ग रथावर तुकाराम महाराज गरुडावर स्वार असलेला पुतळा बवण्यात आला असून हा स्वर्ग रथ पूर्णपणे स्टिलन्स स्टीलने बनविण्यात आलेला आहे. सर्व समाज जातीधर्मासाठी हा स्वर्गरथ देण्यात येणार असून त्याच्या देखभाल खर्च म्हणून नाममात्र फी आकारली जाणार आहे. स्वर्ग रथासाठी लाडशाखीय युवा मंचचे अध्यक्ष भूषण ब्राह्मणकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन लाडशाकीय युवा मंच करण्यात आले आहे.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास केशव रामभाऊ कोतकर, वसंत श्रावण शिनकर, भूषण ब्राह्मणकर, नीरज येवले, डॉ प्रवीण भोकरे, संदीप शिनकर, अमोल नानकर, हिरालाल शिनकर, अनिल कोतकर, नरेंद्र शिरुडे, विजय भामरे, भूषण पिंगळे मनोज चिंचोले, कल्पेश पिंगळे, दीपक शिनकर, गणेश बागड, योगेश भोकरे, विवेक धामणे, प्रशांत येवले, किशोर शिरुडे, अजय वाणी, महेश वाणी, विलास वाकाळकर, जयवंत कोतकर, बंडू कोतकर, विकास कोतकर, कैलास शिनकर, पिरान कोतकर, निलेश शिरुडे, दीपक शिरुडे, गणेश शिरुडे, विजय शिरुडे, निलेश ब्राह्मणकर, सतीश देव, कालू शेठ दायमा, सुनील पाटील, अनिल गवळी आदी उपस्थित होती.