‘लाडू’ प्रेक्षकांना दिसणार बाळकृष्णाच्या भूमिकेत

0

मुंबई:अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतलेल्या झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने काहीच दिवसांपूर्वी ५०० यशस्वी भागांचा टप्पा गाठला. या मालिकेतील अंजली आणि राणा नव्हेच तर बरकत, नंदिता वहिनी, चंदे हि सगळी पात्र महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहेत. या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजनच नाही केलं तर कुस्ती या खेळाचं महत्व देखील दर्शवलं. अंजली आणि राणा यांची हृदयस्पर्शी प्रेमकथा, कठीण परिस्थितीत न डगमगता, एकमेकांच्या साथीने प्रत्येक अडचणीला सामोरं जाण्याची दोघांची वृत्ती प्रेक्षकांना भावली. लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या या मलिकने प्रेक्षकांच्या प्रेम आणि पाठिंब्याने मैलाचा दगड पार पडला आहे.

गोकुळाष्टमीचा हा उत्सव प्रेक्षकांना तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील लाडू प्रेक्षकांना बाळकृष्णाच्या भूमिकेत देखील भावेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे.