मुंबई । लाड पागे समितीची अमंलबजावनी देशभरात करण्यात यावी, सफाई काम हे 365 दिवस चालणारे अत्यावश्यक सेवा असुन सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सफाई कामात ठेकेदारी प्रथा बंद झाली पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सफाई कामगारांचा मेळाव्यात कामगारांना मार्गदर्शन करताना केले.राष्ट्रवादी काँग्रेस सफाई कामगार सेल, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने भव्य सफाई कामगारांचा मेळावा नुकताच महात्मा गांधी सभागृह, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, परळ येथे आयोजित करण्यात आला होता. सदर मेळ्याव्यात शरद पवार यांनी उपस्थित राज्यातील व देशातील सर्व सफाई कामगार आणि दलित समाजाला मार्गदर्शन केले. ‘वित्त निगम मधील सफाई कामगारांच्या केंद्रातील राखीव निधी 557 कोटी स्वच्छता अभियानच्या नावाखाली काढुन घेऊन 5 कोटीवर आणुन जो अन्याय ह्या दलित सफाई कामगारांनवर झाला आहे अश्या अनेक गंभीर प्रश्नांकडे शरद पवार यांनी लक्ष वेधले.
तसेच सफाई कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आणि मुंबई मनपातील 2009 कामगार भरती संदर्भात सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी कामगारांना यावेळी दिले.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांनीही सफाई कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत, मुंबई मनपातील 2009 भरती, मल निसारण खात्यातील मेन शुअर, पाईप शुअर ज्यांचा घानिशी संबंध येतो अश्या कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले आणि मेळ्याव्यात उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेत्या राखीताई जाधव यांना तश्या सुचना केल्या. तसेच कार्यक्रमाची प्रस्तावना दलितमित्र गोविंदभाई परमार यांनी केली. त्यांनी सफाई कामगारांचा घरांचा प्रश्न ह्या मेळाव्यात लावुन धरला.
मालकी हक्काची घरे मिळण्यासाठी विशेष लक्ष!
1986,1987 व 1988 साली निघालेल्या शासन परिपत्रकात सफाई कामगारांना त्यांना त्याच्या मालकी हक्काची घरे मिळण्यासाठी तरतूद केलेली असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे याकडे विशेस लक्ष वेधले. उपाधाय्क्ष राजेंद्र चंदेलिया यांनी संभाषण केले तसेच घर हक्क समितीचे संचालक विक्रांत वालकर यांनी हि भाषण केले. सदर प्रसंगी मुंबई अध्यक्ष सचिन कांबळे, गोविंदराव मोहिते, सुरेखा पेडणेकर, सोहेल सुभेदार, सोहन सिंग, रमेश परब, बबन कनावजे, महाराष्ट्राचे अध्यक्ष शशी मेहत्रे, रवी भिंगानिया, सुरेश तामोत, सतीश लालबिगे, विक्की बढेल, सतीश कडेरा, राजेश टाकेकर, पंकज मुसळे, दिनकर पारधी व सुधीर पाटील यांचा सिंहाचा वाटा होता.